Mumbai Police Bharti Question Paper in Marathi Pdf
1. अनुच्छेद 280 मध्ये कशाची तरतूद करण्यात आली आहे?
A. निवडणूक आयोग
B. वित्त आयोग
C. विधानसभा
D. घटना दुरुस्ती
2. सहकारी चळवळीचा जनक असे कोणास म्हटले जाते?
A. रॉबर्ट ओवेन
B. रॉशडेल निकोल्सन
C. लोर्ड कर्जन
D. यापैकी नाही
3. प्रत्यक्षात आवश्यक असलेल्या कामगारांच्या संख्येपेक्षा अधिक कामगार काम करत असतील तर अशा ठिकाणी……… बेकारी असते?
A. चक्रीय बेकारी
B. छुपी बेकारी
C. हंगामी बेकारी
D. कमी प्रतीची बेकारी
4. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात?
A. साठ वर्ष
B. 55 वर्ष
C. 62 वर्ष
D. 65 वर्ष
5. ‘नारायण श्रीपाद राजहंस’ यांचे टोपण नाव काय?
A. छोटा गंधर्व
B. गोविंद
C. बालगंधर्व
D. गोविंदाग्रज
6. पुढीलपैकी कोणते मानचिन्ह 22 जुलै 1947 ला भारतीय घटना समितीने स्वीकारले?
A. राष्ट्रध्वज
B. राष्ट्रचिन्ह
C. राष्ट्रगीत
D. राष्ट्रीय कॅलेंडर
7. चंद्रपूर जिल्ह्यातील……. याठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे?
A. वरोरा
B. बल्लारपूर
C. भद्रावती
D. राजुरा
8. मांढरदेवी देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. सांगली
B. सातारा
C. कोल्हापूर
D. पुणे
9. जोग धबधबा कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे?
A. नर्मदा
B. घटप्रभा
C. शरावती
D. कावेरी
10. दाजीपुर-राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?
A. हरीण
B. गवे
C. मोर
D. वाघ
11. Covid-19 आजाराची साथ जगातील अनेक देशांमध्ये पसरली म्हणून त्यास……. महामारी असे म्हणतात?
A. तुरळक
B. देशांतर्गत
C. विश्वव्यापी
D. वरीलपैकी नाही
12. ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा?
A. शुन्याकार
B. निराकार
C. साकार
D. सर्पाकार
13. तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे म्हणजे काय?
A. फोडाला झोपणे
B. चिंताग्रस्त होणे
C. काळजी घेणे
D. चिंतातुर होणे
14. कोणत्या दिवशी गंगा नदी डॉल्फिन दिवस साजरा केला जातो?
A. 5 ऑक्टोबर
B. 2 ऑक्टोबर
C. 4 ऑक्टोबर
D. 3 ऑक्टोबर
15. कोणत्या व्यक्तीने 4 ऑक्टोबर 2021 रोजी जपानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली?
A. शिंजो आबे
B. फुमिओ किशिदा
C. योशीहाईड सुगा
D. वरीलपैकी नाही
16. समुदाय विकास कार्यक्रम Community development Program ची सुरवात केव्हा झाली?
A. 2 ऑक्टोबर 1952
B. 2 ऑक्टोबर 1950
C. 2 ऑक्टोबर 1991
D. 2 ऑक्टोबर 1992
17. भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर……. चे अध्यक्ष असतात?
A. प्रादेशिक ग्रामीण बँक
B. नाबार्ड
C. भारतीय स्टेट बँक
D. सेबी
18. भारतात विहिरींची संख्या सर्वाधिक असणारे राज्य कोणते?
A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. उत्तर प्रदेश
D. तामिळनाडू
19. जलसिंचनाद्वारे घेतल्या जाणाऱ्या शेतीस…….. शेती असे म्हणतात?
A. बागायती शेती
B. जिरायती शेती
C. कोरडवाहू शेती
D. खरीप शेती
20. ……. जिल्हा संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो?
A. पुणे
B. नागपूर
C. नांदेड
D. वर्धा
21. 1910 मध्ये जेजुरी पुणे येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली?
A. वि. रा. शिंदे
B. सयाजीराव गायकवाड
C. छत्रपती शाहू महाराज
D. महात्मा फुले
22. अमरावती येथे कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी तपोवन येथे जगदंबा कुष्ठधामाच्या निवासाची स्थापना 1950 मध्ये कोणी केली?
A. शिवाजीराव पटवर्धन
B. पंजाबराव देशमुख
C. बाबा आमटे
D. प्रकाश आमटे
23. “एक गाव एक पाणवठा” या मोहिमेची सुरुवात पुढील पैकी कोणी केली होती?
A. एस. एम. जोशी
B. शिवराव महादेव परांजपे
C. दादासाहेब फाळके
D. बाबा आढाव
24. मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी असे वर्णन प्र. के. अत्रे यांनी कोणाचे केले आहे?
A. साने गुरुजी
B. वि स खांडेकर
C. अण्णा हजारे
D. बाबा आमटे
25. महर्षी कर्वे फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणता विषय शिकवत होते?
A. मराठी
B. गणित
C. भौतिकशास्त्र
D. संस्कृत
26. एक देश एक रेशन कार्ड योजना…….. या तारखेपासून संपूर्ण भारतभर लागू झाली?
A. 1 जून 2020
B. 15 जून 2020
C. 15 ऑगस्ट 2020
D. 18 सप्टेंबर 2020
27. ख्रिस्ती मिशनच्या धर्मप्रसाराला उत्तर म्हणून …….यांनी विचार लहरी पत्र सुरू केले होते?
A. विष्णुशास्त्री चिपळूणकर
B. कृष्णशास्त्री चिपळूणकर
C. रा. गो. भांडारकर
D. शिवराम महादेव
28. महात्मा फुले यांनी पुढीलपैकी कोणता ग्रंथ गुलामगिरी विरुद्ध लढणार्या अमेरिकन जनतेस अर्पण केला आहे?
A. पुस्तकांची कैफियत
B. गुलामगिरी
C. सार्वजनिक सत्यधर्म
D. अखंड
29. लाऊड स्पीकर मध्ये…….. ऊर्जेचे रूपांतर…….. ऊर्जेमध्ये होते?
A. विद्युत, ध्वनि
B. ध्वनि, विद्युत
C. विद्युत, रासायनिक
D. विद्युत, यांत्रिक
30. पानिपत, महानायक, झाडाझडती, संभाजी या साहित्यकृती पुढीलपैकी कोणाच्या आहेत?
A. विश्वास पाटील
B. शिवाजी सावंत
C. भालचंद्र नेमाडे
D. व्यंकटेश माडगूळकर
31. मराठीतील पहिला गद्यग्रंथ कोणता?
A. विवेकसिंधु
B. ज्ञानेश्वरी
C. गाथासप्तशती
D. लिळाचरित्र
32. पुढीलपैकी कोणत्या लेखकाच्या साहित्यकृतीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही?
A. वि. स. खांडेकर
B. वि. वा. शिरवाडकर
C. पु. ल. देशपांडे
D. विंदा करंदीकर
33. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सुर्याशी ही रचना कोणाची आहे?
A. संत मुक्ताबाई
B. संत कान्होपात्रा
C. संत जनाबाई
D. संत बहिणाबाई
34. क्रोमाइट चे 95% साठे एकट्या……. राज्यात आढळतात?
A. ओरिसा
B. छत्तीसगड
C. झारखंड
D. मध्य प्रदेश
35. ……… वृक्षाला भारतीय वनांचा राजा असे म्हणतात?
A. चंदन
B. साग
C. फर
D. पाईन
36. ‘शिवसमुद्रम’ नावाचा धबधबा कोणत्या नदीवर वरती आहे?
A. कावेरी
B. शरावती
C. नर्मदा
D. चंबळ
37. नर्मदा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे?
A. 1290
B. 54
C. 210
D. 724
38. ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी खालीलपैकी कोणती?
A. वेलिंग्टन
B. सिडनी
C. कॅनबेरा
D. वॉशिंग्टन
39. अर्धा उतरलेला ध्वज हे …….. चे प्रतीक मानले जाते?
A. राष्ट्रीय शोक
B. मोठे संकट
C. शांतीचे प्रतीक
D. धोका व क्रांतीचे प्रतीक
40. ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार पुढील पैकी कोणाला असतात?
A. जिल्हाधिकारी
B. मुख्य कार्यकारी अधिकारी
C. जिल्हा परिषद अध्यक्ष
D. विभागीय आयुक्त
41. ….. या राज्य सरकारने स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी पदवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचे जाहीर केले?
A. महाराष्ट्र
B. त्रिपुरा
C. गोवा
D. केरळ
42. पोलीस पाटलाला सजा, निलंबन, दंड करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास असतो?
A. उपजिल्हाधिकारी
B. तहसीलदार
C. जिल्हाधिकारी
D. विभागीय आयुक्त
43. महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लष्करी छावणी नाही?
A. देहू
B. खडकी
C. कामठी
D. मिरज
44. पंचायत समिती सभापती व उपसभापती यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
A. पाच वर्ष
B. अडीच वर्ष
C. सहा वर्ष
D. तीन वर्ष
45. महाराष्ट्रात गावची लोकसंख्या कमीत कमी…….. यापेक्षा अधिक आहे अशा गावांसाठी ग्रामपंचायत स्थापन केली जाते?
A. 200
B. 300
C. 400
D. 600
46. खोटे बोललेले ओळखण्यासाठी……. उपकरण वापरतात?
A. ओडोमीटर
B. पॉलीग्राफ
C. अल्टीमीटर
D. थर्मामीटर
47. कॅथोड किरणांचा शोध पुढीलपैकी कोणी लावला?
A. डेमोक्रिटस
B. डाल्टन
C. विल्यम क्रुक
D. रुदरफोर्ड
48. स्वतंत्र भारताचे दुसरे व शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते?
A. लॉर्ड माऊंटबॅटन
B. श्री. चक्रवर्ती राजगोपालचारी
C. लिनलिथगो
D. आर्यवीन
49. गुजरात मधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
A. सरोजनी नायडू
B. पंडित जवाहरलाल नेहरू
C. सरदार वल्लभ भाई पटेल
D. सेनापती बापट
50. कसोटीत सहाशे विकेटस घेणारा जगातला पहिला गोलंदाज कोण?
A. जेम्स अँडरसन
B. विराट कोहली
C. एम एस धोनी
D. ट्रेंट बोल्ट
Navi mumbai police bharti questions in Marathi
51. सन 1913 मध्ये लाला हरदयाळ यांनी……. स्थापना केली?
A. मित्र मेळा संघटना
B. फ्री इंडिया लीग
C. गदर पार्टी
D. अभिनव भारत
52. ……… ला मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी म्हणतात?
A. जपान
B. ऑस्ट्रेलिया
C. नॉर्वे
D. अमेरिका
53. सूर्याचे आवरण कशाचे बनलेले आहे?
A. ऑक्सिजन
B. हायड्रोजन
C. मिथेन
D. सल्फर
54. भारतातील ‘स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक’ असे कोणास म्हणतात?
A. लॉर्ड मेयो
B. लॉर्ड लिटन
C. लॉर्ड रिपन
D. यापैकी नाही
55. संत नामदेव यांचा जन्म ……. या ठिकाणी झाला?
A. पंढरपूर
B. आपेगाव
C. पैठण
D. नरसी बामणी
56. सार्स हा रोग……… वर परिणाम करतो?
A. हृदय
B. श्वसन
C. मेंदू
D. डोळ
57. उंट या नामाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा?
A. उंटीण
B. उंटणी
C. भांड
D. सांडणी
58. ताळा, अनारसा, किडून-मिडून हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत?
A. अरबी
B. हिंदी
C. तामिळ
D. तेलुगु
59. ‘स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे’ असे कोणी म्हटले आहे?
A. लॉर्ड ब्राईस
B. आयव्हर जेनींग्ज
C. विलियम रॉबसन
D. विलियम जोन्स
60. सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात?
A. गटविकास अधिकारी
B. सभापती
C. उपसभापती
D. विस्तार अधिकारी
61. ताऱ्यांचे लुकलुकणे कशाचे उदाहरण आहे?
A. अपवर्तन
B. परावर्तन
C. अपवर्तनांक
D. अपस्करण
62. ‘कळंब’ नावाचा तालुका कोणत्या दोन जिल्ह्यात आहे?
A. उस्मानाबाद- अकोला
B. अकोला- यवतमाळ
C. यवतमाळ- उस्मानाबाद
D. उस्मानाबाद- वाशिम
63. वज्रेश्वरी हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. पालघर
B. ठाणे
C. रायगड
D. रत्नागिरी
64. सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे?
A. पैनगंगा
B. वर्धा
C. वैनगंगा
D. इरई
65. मुस्लिम लीगने कोणता दिवस ‘मुक्ती दिन’ म्हणून साजरा केला?
A. 1 नोव्हेंबर 1939
B. 22 डिसेंबर 1939
C. 1 नोव्हेंबर 1938
D. 1 डिसेंबर 1938
66. पुणे करारात गांधीजींच्या वतीने कोणी सही केली होती?
A. राजेंद्र प्रसाद
B. ओम बिर्ला
C. पंडित नेहरू
D. पंडित मदनमोहन मालवीय
67. SBI ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
A. 1 जुलै 1955
B. 1 जून 1955
C. 1 जुलै 1954
D. 1 जून 1954
68. कोणता दिवस राष्ट्रकुल दिवस म्हणून साजरा केला जातो?
A. 24 मे
B. 24 एप्रिल
C. 24 फेब्रुवारी
D. 1 मे
69. पादचारी चौकामध्ये सडक पार करत असणे तर आपण…….
A. काळजीपूर्वक वाहन पुढे चालवावे
B. पादचाऱ्यांना थांबवून पुढे जावे
C. पादचाऱ्यांना प्रथम जाण्याचा अधिकार द्यावे
D. वेगाने पादचाऱ्यांच्या अगोदर जा
70. मोटार वाहनास कोणता विमा करणे सक्तीचे आहे?
A. जीवन विमा
B. त्रयस्थ व्यक्तीचा विमा
C. वाहनाचा सर्वसमावेशक विमा
D. वरील पैकी एक व दोन
71. कोणत्या रोगाला ब्रेकबोन ताप असेही म्हणतात?
A. झीका
B. डेंग्यू
C. मिनामाटा
D. डाऊन संलक्षण
72. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो?
A. संसद
B. राष्ट्रपती
C. पंतप्रधान
D. सरन्यायाधीश
73. खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरतात?
A. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
B. मुख्य निवडणूक आयुक्त
C. राष्ट्रपती
D. वरील सर्व
74. ‘बोरा वारे’ कोणत्या प्रदेशातून प्रवाही असतात?
A. सहारा वाळवंट
B. सायबेरिया
C. अंटार्टिका
D. अरबी समुद्र
75. महाराष्ट्राच्या दक्षिणोत्तर विस्तारापेक्षा पूर्व-पश्चिम विस्तार……..?
A. जास्त आहे
B. कमी आहे
C. वेगळा आहे
D. तेवढाच आहे
76. महाराष्ट्रातिल साठ्यांसाठी ओळखले जाणारे नदी को खोरे कोणते?
A. वैंनगंगा व पैनगंगा
B. पैनगंगा व वर्धा
C. वैंनगंगा व वर्धा खोरे
D. कृष्णा खोरे
77. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणी पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झाली?
A. मुंबई
B. पुणे
C. अहमदाबाद
D. बेळगाव
78. लोकमान्य टिळकांनी खंडबंदीची चळवळ कोणत्या संघटनेमार्फत राबवली?
A. प्रार्थना समाज
B. आर्य समाज
C. सार्वजनिक सभा
D. सत्यशोधक समाज
79. भारताला स्वातंत्र्य प्राप्त वेळी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते?
A. मौलाना आझाद
B. जे. बी. कृपलानी
C. राजेंद्र प्रसाद
D. पंडित नेहरू
80. व्हिडिओच्या माध्यमातून केवायसी स्वीकारणारी देशातील पहिली बँक कोणती?
A. HDFC
B. ICICI
C. SBI
D. कोटक महिंद्रा बँक
81. निशाचर म्हणजे काय?
A. अपत्य नसणारा
B. दानधर्म करणारा
C. रात्री फिरणारा
D. वरीलपैकी सर्व
82. ‘आडकाठी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
A. अडचण
B. सुलभ
C. विरोध
D. मोकळीक
83. तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणजे काय?
A. मुकाट्याने दुःख सहन करणे
B. दुसऱ्याला त्रास देणे
C. तोंड बंद ठेवणे
D. वरीलपैकी नाही
84. ‘काकदृष्टीने पाहणे’ अर्थ सांगा?
A. वाईट दृष्टीने पाहणे
B. बारकाईने पाहणे
C. निरकस पाहणे
D. वाईट परिस्थिती न्याहाळणे
85. संमती वय विधेयकास कोणी विरोध दर्शविला होता?
A. आगरकर
B. सावरकर
C. महर्षी कर्वे
D. लोकमान्य टिळक
86. लोकमान्य टिळकांना भारतीय क्रांतीचे जनक असे कोणी म्हटले आहे?
A. व्हॅलेंटाईन चिरोल
B. महात्मा गांधी
C. पंडित नेहरू
D. न्या. रानडे
87. महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे जास्त प्रमाणात आढळते?
A. कोकण
B. मराठवाडा
C. पश्चिम महाराष्ट्र
D. विदर्भ
88. महाराष्ट्र विधानसभा 2019 निवडणुकीमध्ये निवडून आलेले सर्वात तरुण आमदार कोण?
A. रोहित पवार
B. आदित्य ठाकरे
C. दीदी ठाकरे
D. झिशान सिद्दकी
89. ‘अभिनंदन’ ही शिक्षण कर्ज योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली?
A. अरुणाचल प्रदेश
B. आसाम
C. पश्चिम बंगाल
D. गुजरात
90.कोतवालाची निवड करण्याचा अधिकार कोणाला असतो?
A. तहसीलदार
B. तलाठी
C. उपजिल्हाधिकारी
D. जिल्हाधिकारी